STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Tragedy

4  

विजयकुमार देशपांडे

Tragedy

ते माझे घर ..

ते माझे घर ..

1 min
233

माझे ते घर.. ते माझे घर

कुठे कसे हरवले ते घर 

प्रभातसमयी पुढे दिसतसे 

सुरेख रांगोळी अंगणभर ..


घरासमोरी प्रशस्त अंगण 

अंगणात तुळशीवृंदावन

निरांजनी त्या तेवत वाती 

शांत उजळत प्रकाशज्योती ..


सुंदर छोटे उदबत्तीघर 

सुवास पसरे सारा घरभर

हात जोडुनी प्रार्थित सुस्वर 

जाती निनादत गल्लीभर ..


इवल्याशा वाटीमधली 

साखर दाणेदार चिमुटभर

वाटीमधल्या प्रसादास्तव 

"तू तू मी मी" होतसे गजर ..


माया जमली जीवनात 

घेतला मोठासा मी फ्ल्याट 

अंगणाविना सुनासुना तो 

उरले उदास जीवन त्यात ..


"ते हात" ही मज दुरावले 

मायेने पाठीवर फिरले 

ते मायेचे जीर्ण पांघरुण 

आता घरात नाही उरले ..


माझे ते घर.. ते माझे घर

कुठे कधी हरवले ते घर ......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy