Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

विजयकुमार देशपांडे

Others


3  

विजयकुमार देशपांडे

Others


मनाच्या गावात...

मनाच्या गावात...

1 min 218 1 min 218

मनाच्या गावात गेलो मी फिरत

गाठीभेटीसाठी होतो मी झुरत ..


दु:खाचे ते चौक ओळखीचे हसले

सुखाचे ते रस्ते विचित्र भासले ..


काही नातेवाईक अनोळखी झाले  

थोड्या ओळखीचे आपलेसे झाले ..


जुन्या आठवणी किती आनंदल्या

काही स्वत:शीच जरा फुरंगटल्या ..


वेदनांचा होता भोवताली पिंगा

मोह द्वेष वदले दाखवू का इंगा ..


- का नाही वाटत... पुन्हा गावी जावे

मनाच्या गावात स्वच्छंद फिरावे . . .


Rate this content
Log in