आठवण..
आठवण..
रुसतेस तू तेव्हा
आठवण मला निवडुंगाची
तू लाजतेस जेव्हा
आठवण मला लाजाळूची
अबोल होतेस तेव्हा
आठवण पटकन अबोलीची
तू बोलतेस जेव्हा
आठवण डाळिंबाच्या दाण्यांची
तुझा स्पर्श होतो तेव्हा
आठवण मोगऱ्याच्या गंधाची
आरक्त होतेस तू जेव्हा
आठवण लालभडक गुलाबाची
तू चालत असतेस तेव्हा
आठवण अपरिहार्य नागिणीची
तू हसत असतेस जेव्हा
आठवण प्राजक्त टपटपण्याची
मिठीत माझ्या असतेस तेव्हा
आठवण उमलत्या कमलदलाची
तू जवळपास नसतेस जेव्हा -
आठवण नेमकी काट्याकुट्यांची !

