पाणी टंचाई
पाणी टंचाई
पाणी आटले जिमिनीतले
नद्या नाले तलावबी आटले खर
पाण्याविणा कस आता हुणार
पाण्याबिण लोक कस रे जगणार
थेंब-थेंब पाण्याचा जपूनच वापराचा
नायतर एकदिवस असी पाई येईन
का सारे लोक पुरथीवर तडफडून मरन
करा रे या अनमोल पाण्याचे मिरून जतन..
पैसा हाये मुन का काहीबी कराच
पाण्याच्या पाई आपल्या धरणीमाईल
जिथ नाही तिथ बोरिंगचे छेद्रच छेद्र करून
ह्या लोकाईन का नाय तिले रडवून सोडल
आता बाप्पा आपुन पाण्याचा ईचार करू
तलाव,धरण अन् बंधारे बांधून
अडवून पाणी वर नियोजन करू
घेवू आन आपण सारे लोका मिरून