टेबलावरती
टेबलावरती
बारबट्टयावर चालतो आता, रोजचाच गाडा
अंगातल्या विवेकीपणाचा, कुणी वाचतो येथेच पाढा
शपथ शब्द कुणाचा, इथे माय होतो
तर मित्र तोशी त्याला, आसवांची साक्ष देतो
किती चालती संशोधनाचे, हिशोब टेबलावरती
कुणी पक्ष जाणकार इतके, प्याला नाकाने धरती
कुणा आवडे रम अन् , कुणी आयबीचे नाव घेतो
ग्लासाशी ग्लास भिडवूनी, मित्रत्व आत नेतो
मारती झुरके सिगारचे,एकाहूनी एक भारी
टाईमपास एवढा, जणू कामाची एक पाळी
सद्याला टांग आवडे, तर फर्माईश कुणाची बोटी
विन्या तोडूनी तंदूर खातो, बाबू मांगतो ज्वार रोटी
कुणा घरी दिवाळी, तर कुणी यात उपाशी
रंगवीतांना एक पात्र, मित्र बनलेत एक राशी
बाता सांगती सर्व, सगळेच एक दिलाच्या
कुणी हाक मारूनी विचारतो, पावत्या बिलाच्या
इथेच टेबलावरती, चाले ऑफीस खोरी
रात्रीच देवघेव अन्, सकाळी ईमानदारी
हिशोब ठेवूनी टेबलावर, रिश्वत मागतो पुढारी
वसुलतो लाख पटीने , पाजलेल्या मदीरेची उधारी !!