STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

कोरोना वर्सेस पोशिंदा

कोरोना वर्सेस पोशिंदा

1 min
277

घेऊ नकोस घोट जहराचा

तुर्तास तू थांब जरा

तुझेच राज्य येणार पुन्हा रे

हे पोशिंद्या वीर नरा !!!


तुला लुटले ज्यांनी कोणी

त्यास लागू दे तुझा लळा

कर्मच आहे तराजू न्यायाचा

भूमिपुत्रा तू थांब गड्या


काळ्या आईच्या कुशीत तुझा रे

असाच वाढू दे वंश दिवा

नजर तुझ्या घामावर ज्यांची

तेच मानतील तुला दवा


धगधगती जग हे व्हॉयरसने सारे 

जाळ पाड तो तू फिका

तुझ्या चौरस अन्नाचा होऊ दे

कोरोना वरचा आज टिका


बंद पडले मॉल मंदीर बिचारे

हतबल देव अन् मंत्र तुला

इमेन्यू पावरचा अगाध तू साठा

माणसातला 'पावर ब्रँड ' खरा !!!


१ )कोणालाही न फसवता शेतकऱ्या सारखी इमेन्यू पावर वाढवू या.

२ )कोरोनाची साथ रोखण्यास सहकार्य करून जीवन निरामय बनवू या.

३ )चला तर मग सरकारने दिलेच्या निर्देशांचे पालन करुन कोरोनाशी दोन हात करू या.

४ ) शेतकऱ्याच्या आशिर्वादाने मिळत असलेला चौरस आहार सेवन करू या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन