Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Tragedy

4  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

वेडा बाप...!

वेडा बाप...!

1 min
23.4K


मनगटाच्या जोरावर अख्ख्या संसाराची भक्कम इमारत अलगद पेलणारा बाप,

जेव्हा काठीच्या आधाराने चालाया लागतो

तेव्हा सुरकुत्यांनी अंगावर वखर फिरवला असतो,

अंगावर वखलेल्या सऱ्यांतील रक्त आटलेलं असते खरे

पण त्याच्याच घामाच्या सिंचनाने बाग आल्हाद झालेली असते, 

अगदी सुखासिन होऊन अजूनही हिरव्यागार कांतीने डुलत असते,


परंतू तेव्हा खरा मालक बाप बागेचा माळी बनलेला असतो,

एकाकी खोलीत कुंठीत असतो प्रत्येक रात्र मरणाच्या आशेने

आत्महत्या केल्यानंतर मोक्ष मिळणार नाही या अंध समजुतीमुळे,

कुठे शोधत असतो सूर्य अधू दृष्टीच्या दिव्याने गडद अंधारात रात्रीच्या,

किरकिरत्या रातकिड्यांना साक्ष ठेवून अश्रूंचे इंधन घालून चेतवीत असतो शेकोटी,

काकुळत्या थंडीत अस्थिपंजर शरीराला ऊब मिळावी यासाठी, 


आठवत असतो नाहक गाजविलेलं कष्टाचं समर उपसलेल्या पोटाने,

फालतूचं हसत असतो नशिबाला खरं मानित एकांतात वेड्यासारखा,

मनाला दिलासा देत टेहाळणी करत असतो रखवालदार बनून

आपल्या स्वतःच्याच घरच्या चौकटीची,

दिवसा शोधत असतो एखादा मायेचा माणूस अनोळख्यांतला,

येणाऱ्या जाणाऱ्यांतील हाताने खुणवित,


कारण कुणाशी तरी दोन शब्द बोलावे या भाबड्या आशेवर 

मनाला हलकं करण्यासाठी थोडंसं,

तर कधी सवंगडी गेल्याची बातमी ऐकून खिन्न होत असतो

पाझरलेल्या पापण्यांच्या कडा पुशित,

हुंदका भरत आगंतुकाला आपलं समजून सांगत असतो निरोप

मरणाचं बोलावणं त्वरीत धाडण्याचा देवाकडे,


मध्येच अचानक रडत असतो ओक्साबोक्शी अवकाळी पावसासारखा,

अशातच काहींना त्याच्या कष्टाची परतफेड म्हणून शेवटी लाभलेले असते ऐश्वर्य, वेशीवरच्या वृद्धाश्रमाचे,

खरं तर मागे गडगंज संपत्ती सोडल्यामुळे आपल्यांनीच दिलेल्या अनाथालयाचे,

कुटुंबाला मोठं करण्यासाठी अहोरात्र झिजलात म्हणून

मोबदल्यातील उधारीच्या छताचे,

जिथे जळणार असतो तो जीवंतपणी आजीवन क्षणागणिक,


तिथे निखाऱ्यांशी मैत्री करत जीवनातील अनुत्तरीत प्रश्नांचे बंध मोकलून समजून घेत असतो संन्याशाचे गुढ,  

अन् स्मृतिंच्या धगधगत्या सरणात, आपल्याच देहाची चिता रचून, 

"जन्मदाता वेडा बाप पेटत असतो अंतिम क्षणी!!"


Rate this content
Log in