यौवना
यौवना
1 min
193
तिच्या ओठ चुंबनाने
सारे अंग अंग न्हाले
मधुरस ओघळला सारा
नदींनाही पूर आले
पापण्यांचा समुद्र किनारा
तहानला अथांग प्यालो
फिरलो गर्तेत जेव्हा
मी पण सागर झालो
मखमली तारुण्य नव्हे ते
काया अवघीच मलमल
साथ रोजची जरी पण
प्रेमाची तिच तळमळ
तिचे मुख अनोखे
भाळी चंद्र तारे
निसर्गदत्त यौवना ती
उणे वसंत सारे