Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Abstract

4  

.प्रमोद घाटोळ

Abstract

जीवन आखरी तसे कोरडे ...

जीवन आखरी तसे कोरडे ...

1 min
279


पिकली पाने खाली पडती , हिरवी पालवी ये त्या वरती

खेळ निसर्गाचा खरा जरी परी,मायेमुळे जग हे रडती


मायेसाठी खून ही होतो , मायेसाठी कुणी हळहळतो

कुणी डाव मोडूनी पुन्हा खेळतो , तर कुणी गळ्यास फास चढवीतो


मायेमुळे कुणी माय बनतो , माया जडता कुणी प्रेम ही करतो

कधी हसते गोड चिमुकली , बाप म्हणूनी तिजला वरतो


डोळ्यातली अनेक सपने , स्वार्थी झालीत सारी कोणे

माया बसता बोहल्या वरती , जगाशी न राहती देणे घेणे


मात्र कुणाचे हृदय द्रवते , पांगळ्याचा हात तो धरतो

तर कुणी द्रव्य चोरीतो , आजन्म कारावास भरतो


मायेतुनी प्रेम निपजते , कधी मग भानही हरते

खेळ रंगतो आणिक प्रेमाचा, युगल गीत त्यातूनी फुलते


माया होते कधी पाणवठा , कधी जिजाई कधी ज्योतिबा

भगतसिंगाची देशभक्ती अन् सावित्रीतील होते प्रतिभा


मायेचे असे किती रुप अनोखे , लिहूनी नी उरती एकही रोखे

मेघ बरसती धरणी वरती , जीवन आखरी तसे कोरडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract