STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

तिरंग्याचे रंग होऊया

तिरंग्याचे रंग होऊया

1 min
183

मराठमोळ्या मातीचा मस्तकी माझ्या टिळा

टापांच्या धुळीत लागला शिवरायांचा लळा SS


आकाशी ध्वज फडफडला

अंगणी पडला सडा

काखेतून निसटला घडा

गुंजला वेदमंत्र खरा........... (१)


जलात उठला नवा खळखळा

उजेडली सारी धरा

पंख पसरवीत भाटं उडाले

सुस्वर झाला गळा............. (२)


कर आता कंपीत झाले

रायगडा जाऊ चला

शर्यत लावू पळा

जाऊ वेगे चढूनी कडा......... (३)


तिरंग्याचे रंग होऊया

हातात हात धरा

संविधानातूनी समतेचा

अखंड वाहो झरा............. (४)


Rate this content
Log in