.प्रमोद घाटोळ

Others

2.3  

.प्रमोद घाटोळ

Others

ती....

ती....

2 mins
294


ती समोर बघून मी अनावर झालो तिला कवेत सामावून घेण्यासाठी ,एखाद्या वादळा सारखा

तसेच मी त्वरेने तिच्या अंतरंगाच्या आत शिरलो,

क्षणाचाही विचार न करता जरासाही तिने माझे स्वागतच केले ,

माझ्या पायाच्या धुळीवर ओंजळ घालीत शीतलतेची आणि नवागत म्हणून आदरतिथ्याने

मी अगदी थक्क जाहलो , तिच्या प्रेमाची मोजदाद करतांना ,आणि

फार अचंबीतही कारण तिची नी माझी ती पहिलीच भेट होती ...

माझे ओठ तिच्या अमृत धारेसाठी फार हळवे झाले होते,

मग तिच्या पान्ह्याला न कळतच अलगद स्पर्श केला , व्याकुळलेल्या शुष्क ओठांनी मी

तेंव्हा त्या चीरतरूण धारेला ओठात साठवतांना तृप्त झाल माझ मन

अन् पेटलेल शरीर थंड पडलं क्षणांत, तिचे सुंदर मलय कंठात भरतांना

काही खगही विहरतांना दिसलेत तेंव्हा आकाशात, तिचा विरह सहवेनात म्हणून तहानलेले 

यास्तव तिच्यातील अवाक्य प्रेमाची जाणीव झाली त्यावेळी ,जे तिच्या निर्झरातून ओसंडून वाहत इोते

मी भाव विभोर आणि निशब्दही झालोत एवढे निष्कलंक प्रेम बघून ,

तेव्हा आठवण झाली त्या स्तनांतील दुधाची आणि मायच्या अथांग प्रेमाची

झाडेवेली व कवडश्यांनी तिचं रुप अधिकच खुललेल होतं ,

प्रत्यक्ष नभांगणात नववधू उभी राहावी अशी ती वेल्हाळ वाटत होती

तिच्या किनाऱ्या लगतच्या तृणांवर दव निवांतपणे खुशीत डुलत होते

झाडफुलांनी रंगबिरंगी नक्षी काढलेली होती माझ्या स्वागतासाठी ,

अन् फुलचुख्यांनी मंडप घातला होता

एवढं अपार प्रेम पाहून मी अतिशय भारावून गेलो होतो ,

तेव्हा डोळ्यातील सुखाश्रूंनी तिच्या अवीट प्रेमाची पावती दिली मला

मी जड अंतकरणाने पुढे निघालो , माझ्या क्रमिक ठिकाणावर जाण्यासाठी

त्यानंतर अनेक दिसं उलटून गेलीत ,

पण मी अजून पर्यंत नदी सारखं निर्व्याज्य प्रेम , कुठल्याही चराचरात बघीतलं नाही

कधी वाटतं माय तर फक्त काहींचीच असते , पण नदी मात्र सर्वांची माता आहे

वात्सल्याची भगिरथ गंगा...!!!


Rate this content
Log in