अन् मी प्रेमकवी झालो...
अन् मी प्रेमकवी झालो...
सांगू कसे कुठे मी, गुपीत माझ्या या प्रियेचे
भरली डोळ्यात कशी ती,या बावऱ्या पणाचे
कारण प्रश्न नाजूक बंधनाचा, आयामही वाढलेले
हृदय तरुण मात्र, भावनांनी वेढलेले
पडता कटाक्ष तिचा तो , सुंदर काजळ्या नयनांचा
वाढली उरात धकपक , मोह आवरेना पापण्यांचा
तिच्या काळ्याभोर कुंतलांना , वारा स्पर्श घाली
कधी अबोल चाफा , हसतो तिच्याच गाली
कुट्टप्रावरणांच्या अंगमहली,रातराणी बहरुन आली
स्फुरण चढले मला मग , प्राक्तने घायाळ झाली
उत्तुंग या घडीला, ती रजनीच होती फक्त भाळी
अन् आठवांचा सुगंध तिचा दश दिशांतूनी वाली
मग हरवले भान माझे, कंपीत जाहले कर पण
रात्र न्हाऊन गेली, फुलले माझ्या कवितेत प्रेमपण

