भेट
भेट


पावसाच्या सरींना
कुठे ठेऊन आलीस,
पडणाऱ्या पावसात
एकटीच भिजून आलीस.
कोरड्या केसांवर पावसाचं
पाणी घेऊन आलीस,
थंड गार हातांनी रोमांचक
स्पर्श करून गेलीस.
मंद वाऱ्यासारखी
शांत गतीने आलीस,
मनाच्या तारांना
अलगद छेडून गेलीस.
वेळ नव्हताच तुला तरी
भेट द्यायला आलीस,
आभार मानायलाही
वेळ नाही दिलीस.
सुसाट पळणाऱ्या
वाऱ्यासारखीआलीस,
झुळूक येऊन निघून जाते
तशीच निघून गेलीस.