पाऊसधारा
पाऊसधारा
1 min
208
मेघ दाटून येताच नभात
मोर फुलवितो पिसारा
आनंदाने नाचतो मोर
पडण्याआधी पाऊसधारा
क्षणात बदलतो कोस ऋतू
सुटतो रोमांचक गार वारा
वाऱ्याच्या या गारव्यासवे
पडतात या पाऊसधारा
चिंब भिजली ही धरणी
हिरवाईने नटला शेत सारा
फुलेही फुलली परसात
बघा पडताच पाऊसधारा
पावसाच्या सरीत भिजण्याचा
आनंद असतो सुखावणारा
रोमांचक करतात मनाला
पडणाऱ्या या पाऊसधारा
