रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
53
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावणांना आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा भाऊ बहिणींत असावा.
वर्षाला एक दिवस असा यावा,
शब्दांपलीकडच प्रेम बंधनात बांधावा,
रेशमी धाग्यांनी हात सजावा,
या बंधनाच्या वर्णनास शब्द नसावा,
असा गोडवा भाऊ बहिणींत असावा.
बहीण भावाच्या अतूट, उत्कट, निस्वार्थ,
प्रेमाची आठवण आणि उत्कर्ष वाढावा,
राखी बांधण्याच्या या सणातून,
स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत व्हावा,
असा गोडवा भाऊ बहिणींत असावा.