मनसोक्त
मनसोक्त


खूप आठवण आली आज
एकदा भेटायला येशील का ?
माझ्याशी मनसोक्त बोलशील का ?
आज भेटल्यावर एकांतात
मिठीत मला घेशील का ?
माझ्याशी मनसोक्त बोलशील का ?
तुझ्या मिठीत घेऊन मला
भरभरून प्रेम देशील का ?
माझ्याशी मनसोक्त बोलशील का ?
खूप प्रेम करतो ग तुझ्यावर
मला समजून घेशील का ?
माझ्याशी मनसोक्त बोलशील का ?
माझ्या या अबोल प्रेमाचा
स्वीकार तू करशील का ?
माझ्याशी मनसोक्त बोलशील का ?