बालपण
बालपण




बालपण परतायला हव
पावसा आधिच्या गारव्यात
मन गार व्हायला हव,
येणाऱ्या गारव्यासोबत
बालपण परतायला हव.
कुणी सांगावं या पावसाला
मन चिंब व्हायला हव,
पडणाऱ्या सरीसोबत
बालपण परतायला हव.
मातीच्या या सुगंधाने
मन तृप्त व्हायला हव,
येणाऱ्या सुगंधासोबत
बालपण परतायला हव.
पावसाच्या खेळासारखं
खेळायला थोडा वेळ हवा,
बलपणताला आनंद
आज पुन्हा परतायला हव.