माझ्या स्वप्नातली परी
माझ्या स्वप्नातली परी
1 min
340
स्वप्नांच्या दुनियेत भेटली एक परी
चमचमती जादूची छडी हातामध्ये धरी
सुंदर अशा परीचा सुंदर तो पोशाख
तिच्या त्या दुनियेत वेगळाच तिचा थाट
छडी फिरवून जे मागू ते ती देते
एवढी जादू तिला कशी बरं येते ??
सगळच कसे आहे तिथे डोळे दिपवणारे
खाऊ आणि खेळण्यांनी सतत रमवणारे
अभ्यासाला मिळते तिथे आम्हाला सुट्टी
पक्षी आणि फुलांशी जमली माझी गट्टी
दररोज स्वप्नात भेटायचा मी परी कडे केला हट्ट
प्रेमाने जवळ घेऊन तिने मला मारली मिठी घट्ट
