ती
ती
1 min
145
ती वावरत असते अवती भोवती
सांभाळते घर आणि जपते नाती
जरी दिसत असेल नाजूकशी ती
जपून ठेवलीये तिने अपार शक्ती
दोन हातांनी ती इतकी कामे करते
अदृश्य हातही असावेत असे भासवते
सर्व काही ती असे काही निभावते
जे आपल्या आवाक्याबाहेर असते
कर्तव्य,कर्तृत्वाची अशी सांगड घालते
जबाबदार्या सर्वच चोख ती बजावते
ती ही कधी दमते काहीशी हिरमुसते
तरी लगेच सावरत जोमाने उभी राहते