मी जिनी
मी जिनी
1 min
129
एकदा कधीतरी मला जिनी व्हायचयं
जादुच्या दिव्यामध्ये लपून बसायचय
दिव्याच्या आत मस्त झोपी जाईन
पण मदतीला लगेचच धावून येईन
पूर्ण करीन मी त्यांच्या सर्व इच्छा
स्वप्नांचा जे सतत पुरवतात पिच्छा
झाडा फुलांचे ही म्हणने मी ऐकीन
त्रास ना देई कोणी काळजी मी घेईन
जादूने सर्वांचे दुःख नाहीसे करीन
आनंदात साऱ्यांच्या सामीलही होईन