संधी प्रतिदिनी
संधी प्रतिदिनी
1 min
425
उजेड निसटतो जशी तिन्ही सांज होते
उत्साह हरवतो आणि शरीरही थकते
विचारांची गतीही तशी मंदावत जाते
संथ वार्याच्या झुळूकेत मन रिते होते
पक्ष्याच्या पंखाखाली पाखरू विसावते
प्रत्येक जीव काहितरी आडोसा शोधते
काही हिशेब होती पूर्ण काही शेष राहते
थोडेथोडके यश देखील नवी आशा देते
जशी रात्र संपते आणि नवी पहाट होते
कष्टाने तांबडी माती हिरव्या रंगात डोलते
जरी एकच आयुष्य तरी किती संधी देते
दर दिवशी आयुष्य नव्याने सुरू होते