अंतराळवीर
अंतराळवीर
गोलाकार तबकडी आकाशातून आली
गरगर गिरकी तिने स्वतःभोवती घेतली
लख्ख त्या प्रकाशात डोळे दिपून गेले
कोणास ठाउक आत कोण लपून बसले
उघडले तिचे दार नि शिडी बाहेर आली
त्यातून एका एलियनने बाहेर उडी मारली
मी घाबरलो जसा त्याने हात पुढे केला
फिरायला जाऊ आकाशी असेही म्हणाला
आनंदाने लगेचच मी त्याला हो म्हटले
काही वेळातच आम्ही त्याचे घर गाठले
मुक्काम केला ग्रहांवर मग गेलो चंद्रावर
भ्रमण करताना वाटले परतावे पृथ्वीवर
म्हणालो एलियन मित्राला मी पुन्हा येईन
अंतराळवीर बनून देशाची शान वाढवीन