कृष्णवेळांचा सोहोळा !
कृष्णवेळांचा सोहोळा !
प्रगल्भ राघवक्षण ते दिनभर, विसरून जगतो काळवेळा !
खिन्न सायंकाळी मात्र, पोरकट त्या मी स्मरतो कृष्णवेळा !
जोखावयास स्वप्नांना, करितो भावनांचा तराजू मी गोळा !
भार दुःखाचा परिमाणी मोठा, सुख भरते केवळ तोळा !
कृष्णक्षण ते उगा आठवतो, फिरवतो मनपाटीवरती बोळा!
अन अशातच केंव्हातरी मग, नीरव पहाटेस लागतो डोळा !
सायंकाळ ती उगा दवडतो, भरवून शब्दसख्यांचा तो मेळा !
शब्द भावनांच्या हिंदोळयावर मग, व्यर्थ उडवतो पाचोळा !
त्यातूनच कधी मग कविता जन्मते, प्रसववेदनेचा सोहोळा !
विरूनि जातो राहुलचा सोहोळयात, अस्वस्थ भाव तो भोळा