STORYMIRROR

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

2  

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

1 min
1.1K

उध्वस्त झाला बहर मनाचा, खचून नको जाऊस।

बरंच काही शिकवतो मज, हा परतीचा पाऊस।।


गडगडाट तो करुनी देतो, दुःख आणि वेदना।

सामर्थ्य सोसण्याचे मिळते, सोसून त्या यातना।।


भोगाचेही क्षण नशिबी, नको सुखात या रमूस।

बरंच काही शिकवतो मज, हा परतीचा पाऊस।।


ग्रीष्माने ज्या दिली जखम ती आषाढाने बुजवली।

बुजलेल्या त्या जखमेवरची, खपली तू उडवली।।


तोच भरणार जखमा साऱ्या, नको विचार करूस।

बरंच काही शिकवतो मज, हा परतीचा पाऊस।।


परतून जाता भरतोस दुःखद आठवांचे खळे।

तू दिलेली स्वप्ने भंगता, पावसा भरून येती डोळे।।


पहा स्वप्ने तू नवी आशेची, नको कण्हत जगूस।

बरंच काही शिकवतो मज, हा परतीचा पाऊस।।


उध्वस्त झाला बहर मनाचा, खचून नको जाऊस।

बरंच काही शिकवतो मज, हा परतीचा पाऊस।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational