महापूर !!
महापूर !!
कृष्णामाते !!!
कृष्णामाते, दावा असा
मांडलास का ग !
शांत तुझा काठ
असा सोडलास का ग !!
तुझ्याच पावलांनी
दाखवली समृद्धी !
पाऊलखुणा आज तू
पूसल्यास का ग !
होते आपले ग
माता लेकराचे नाते !
बंध असा क्षणामध्ये
तोडलास का ग !!
शांत वाहताना तू
सोडली चाकोरी !
नियम चाकोरीचा
असा मोडलास का ग !!
विस्थापित मन आता
सोडले घरदार !
घराचा उंबरा
आता सोडशील ना ग !!
चुकलेल्या लेकरा
माफ करशील ना ग !
चाकोरीत पुन्हा तुझ्या
वाहशील ना ग !!