Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

3.2  

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

स्त्री शक्ती !!

स्त्री शक्ती !!

1 min
24.7K


बहु रूपात वावरताही 

भाव नसतो कधी सक्तीचा !

अभिमान म्हणूनच नेहमी

वाटतो मला स्त्री शक्तीचा !!

वेगवेगळ्या या नात्यांमध्ये 

तू एकरूपतेने सामावतेस !

दुधामध्ये अलगद जशी तू 

साखर बनून विरघळतेस !!

हव्यास ही नसतो तुला 

दुधावरच्या त्या सायीचा !

अभिमान म्हणूनच नेहमी

वाटतो मला स्त्री शक्तीचा !!

तू म्हणजे खरे तर 

गोड स्वप्न विधात्याचं !

थोडं जास्तच ओतल त्याने 

गहिरेपण तुझ्यात नात्याच !

जपणुक नात्यांची नेहमीच 

खेळ असतो तुझ्या युक्तीचा !

अभिमान म्हणूनच नेहमी

वाटतो मला स्त्री शक्तीचा !!

वेदनांनाही लाज वाटावी 

अशी तुझी सहनशिलता !

कार्यपुर्तीस नेण्याकरिता 

असते तुझी गहन दृढ़ता !!

हिणवले जरी अबला म्हणुनी 

पाझर आटत नाही भक्तीचा !

अभिमान म्हणूनच नेहमी

वाटतो मला स्त्री शक्तीचा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational