चैतन्यारती !!
चैतन्यारती !!
फुलाफुलांच्या गंधित माळा, चैतन्य सजले!
कैवल्याचे प्रवासी सारे , आरतीला जमले !!
शुभ्र तेज ते मुखकमलाचे, भवताली पसरे !
रोमांचित मी उभा सामोरी, भवदुःख विसरे !!
रामनामी गजर गंभीर , सारे जण रमले !
कैवल्याचे प्रवासी सारे , आरतीला जमले !!
नामरूपी तो सापडला मज, चैतन्य माझा !
रामनामात गवसला तो, गोंदावलेचा राजा !!
चैतन्याचे गुणगाण गाण्या, सारे सरसावले !
कैवल्याचे प्रवासी सारे , आरतीला जमले !!
काकड्याचा निनाद करी हा आसमंत सारा !!
रम्य अश्या पहाट समयी , झाला चैतन्य जागा!
लोणी साखर प्रसाद घेवुनी जन हे सुखावले !
कैवल्याचे प्रवासी सारे , आरतीला जमले !!