Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RAHUL RAJOPADHYE

Romance

4.6  

RAHUL RAJOPADHYE

Romance

बंध

बंध

1 min
218


विझले कसे कोणा ना कळले !

भाव डोळ्यातल्या दृष्टीतले !!


ओळखीचे झाले अनोळखी! 

हे नाते मनातल्या मनातले !!


आजही छळतात मला !

ओळखीच्या पाऊलखुणा !!


जखडलेल्या या पावलांना !

चालण्याचे बळ का, देवू पुन्हा !!


गेले कधी, कोणा न कळले !

त्राण सोबत्याच्या पायातले !


ओळखीचे झाले अनोळखी! 

हे नाते मनातल्या मनातले !!


जाणवते आजही मला ती !

धडधड तुझ्या काळजातली !!


दिसते आजही मला ती !

अव्यक्त थरथर आवाजातली !!


संपले कधी, कोणा न कळले !

शब्द माझ्यातल्या तूझ्यातले !


ओळखीचे झाले अनोळखी! 

हे नाते मनातल्या मनातले !!


मैत्रीच्या प्रांगणात आपल्या !

दूर ठेविल्या सगळ्या बाधा !!


जगलो आत्मिक प्रेम आगळे !

जणू कृष्ण मी अन् तू राधा !!


तुटले कधी, कोणा न कळले !

बंध राधेतल्या कृष्णातले !


ओळखीचे झाले अनोळखी! 

हे नाते मनातल्या मनातले !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance