STORYMIRROR

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

3  

RAHUL RAJOPADHYE

Inspirational

वसुंधरेचे मागणे

वसुंधरेचे मागणे

1 min
822

काळजी घेता धरा ही, काळजीने वागते।

मागणे वसुंधरा ही, हेच तुम्हांस मागते।।


विघटनाने कचऱ्याचा होईना तिला निचरा।

सोसवेना तिला आता, प्लास्टिकचा हा कचरा।।


पर्यायांचा वापर करा रे, कळकळीने सांगते।

मागणे वसुंधरा ही, हेच तुम्हांस मागते।।


अतिक्रमण निसर्गावर, श्वास तिचा कोंडतो।

दाता निसर्गाशीच, माणूस उगा का भांडतो।।


निसर्गाचेच प्रश्न पृथ्वी, रोज नव्याने मांडते।

मागणे वसुंधरा ही, हेच तुम्हांस मागते।।


पर्यावरण रक्षणाचे, घातले जरी रोज जागर।

जाळले जंगल, अन गिळला तुम्ही तिचा सागर।।


तुमचेच माप पृथ्वी, पदरी तुमच्याच टाकते।

मागणे वसुंधरा ही, हेच तुम्हांस मागते।।


व्हा शहाणे लोकहो, धरा पर्यावरणाची आस।

घ्या काळजी धरेची, सुसह्य करण्या अधिवास।।


प्लास्टिकमुक्त पृथ्वी, तुमच्यासाठीच ती मागते।

मागणे वसुंधरा ही, हेच तुम्हांस मागते।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational