STORYMIRROR

RAHUL RAJOPADHYE

Romance

4  

RAHUL RAJOPADHYE

Romance

लावणी!!

लावणी!!

1 min
327

मी तुझी राणी रे राजा, फुलव प्रितीच्या बागा!

राजा तुझ्या,

अरे राजा तुझ्या, 

काळजात दे मला जागा!!


अरे राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


पोर कोवळी अल्लड मजला नाही कळाले इशारे!

नजर घुसता नजरेत दाटल्या भावना अशा का रे!


वयात आले मी रे आता, चोळी दाटली अंगा!

अन् राजा तुझ्या,

ए राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


अरे राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


मोहरले मी अंगोपांगी, स्पर्श चोरटा होता!

घायाळ करती बाण नजरेचे, मजला येता जाता!!


चोच मारण्या टपले राघू, राखू कशा या बागा!

अन् राजा तुझ्या,

ए राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


अरे राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


ज्वानीच्या फसवून गेल्या ओलेत्या मज वाटा!

घसरून पडले मिठीत तुझ्या, पायात रुतला काटा!!


राणी तुझीच ना रे, राया जरा धिराने वागा!

अन् राजा तुझ्या,

ए राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


अरे राजा तुझ्या, काळजात दे मला जागा!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance