STORYMIRROR

RAHUL RAJOPADHYE

Others

2  

RAHUL RAJOPADHYE

Others

मैत्री

मैत्री

1 min
172

वेदनांना माझ्या जशी, 

तुझ्या अश्रूंची खात्री !

डोळ्यात दिसते मला, 

तुझ्या माझ्यातली मैत्री !!


सुखाच्या मार्गावरती, 

तूच माझी आनंदयात्री !

सोबतीत दिसते मला, 

तुझ्या माझ्यातली मैत्री !!


तूच उजळल्यास माझ्या, 

अंधारलेल्या किर्र रात्री!

प्रकाशात दिसते मला, 

तुझ्या माझ्यातली मैत्री !!


संवादाची गरजच नाही, 

भावना ओथंबती गात्री !

मौनातच दिसते मला, 

तुझ्या माझ्यातली मैत्री !!


Rate this content
Log in