STORYMIRROR

RAHUL RAJOPADHYE

Others

2  

RAHUL RAJOPADHYE

Others

सोबती !!

सोबती !!

1 min
446

कृतार्थतेचे भाव उरी या, हृदयातून जागती !

तृषार्त माझे मन हे झाले, तृप्त तुझ्या सोबती !!

................................तृप्त तुझ्या सोबती !!

विवंचनांची रात्र दाटली, तिमिर मना भोवती !

प्रकाश तुझा अन उजळली, पहाट मना जोगती !!

क्षितिजावरती प्रथम शलाका, मनास आश्वासिती!

तृषार्त माझे मन हे झाले, तृप्त तुझ्या सोबती !!

................................तृप्त तुझ्या सोबती !!

प्रवासाची या उर्मी दाटली, कुंपण मार्गा भोवती !

सेतु तुझा अन सापडली, वाट मना जोगती !!

वाटेवरची तुझीच सोबत, पावलांस आश्वासिती!

तृषार्त माझे मन हे झाले, तृप्त तुझ्या सोबती !!

................................तृप्त तुझ्या सोबती !!

कृतार्थतेचे भाव उरी या, हृदयातून जागती !

तृषार्त माझे मन हे झाले, तृप्त तुझ्या सोबती !!

................................तृप्त तुझ्या सोबती !!

साहित्याला गुण द्या
लॉग इन