STORYMIRROR

डाॅ.अर्चना पाटील

Inspirational

4  

डाॅ.अर्चना पाटील

Inspirational

गुढी

गुढी

1 min
41K



मुलगा खुणगाठ वंशवृद्धीची

त्यक्तावी परंपरा मनुस्मृतीची

मुलगी शिदोरी दोन्ही घराची

रोवूनी मेखला स्त्री शिक्षणाची

गुढी उभारु परिवर्तनाची...

सासू आणि सून नात्याची

गुंफण जटिल धाग्यांची

व्हावी वृद्धी आपुलकीची

तोडूनी श्रुंखला परंपरेची

गुढी उभारु परिवर्तनाची...

व्यथा नोकरदार नारींची

लढाई प्रतिदिनी जिकरीची

अपेक्षा तव आदराची

देवूनी भेट प्रशंसेची

गुढी उभारु परिवर्तनाची...

जपणूक रामकृष्ण गाथांची

नांदी आपुल्या संस्कृतीची

नितांत गरज कलियुगाची

गुढी उभारावी परिवर्तनाची

गुढी उभारावी परिवर्तनाची ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational