STORYMIRROR

डाॅ.अर्चना पाटील

Inspirational

3  

डाॅ.अर्चना पाटील

Inspirational

कोरोना ॠण

कोरोना ॠण

1 min
330

रम्य सूर्योदय दिसे सकाळी 

लेविले धरेने कुंकूम भाळी 

अगणित, सुंदर रविकिरणे 

तेजोनिधीची ती तीरकमाने 

पुष्प- पर्णांनी पृथा बहरली 

जीवनवायू पातळी उद्धरली 

बहिर्वायुचा काळसर्पी वेढा 

ध्वनीचा होता नाद केवढा 

सृष्टीचे नियम,अमाप विचारी 

कृतीपरी परीवर्तित माघारी 

कात टाकली, पृथ्वी नटली 

सूक्ष्म जिवे किमया साधली 

वाहते झाले सात्विक वारे 

एका विषाणूचे कर्तव्य सारे

डार्विन सर्वतोपरी उमजला 

जो तगला तोच जिंकला 

कोरोनारुपी ॠण मनाला 

निसर्ग नव्याने पुन्हा भेटला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational