STORYMIRROR

डाॅ.अर्चना पाटील

Others

3  

डाॅ.अर्चना पाटील

Others

माझी आई

माझी आई

1 min
199

रुजवले अंगनी जाई-जुई 

सुवास दरवळे ठाई ठाई 

तैसाच बहरला मोगरा 

जास्वंदाचा जर्द तुरा 

कौतुके महिमा गाती 

कर तव चरणी जुळती...


दिधले तव मूत्रपिंड दान 

जगवलास दशके सत्यवान 

पितृछायेचे दिलेस वरदान 

दडवून वेदना अन् रुंदन 

धन्य सावित्री तू जगती 

कर तव चरणी जुळती...


गत जन्माची ग पुण्याई 

प्रसवलेस तू मम आई 

चरणी तव वंदन विठाई 

पुनर्जन्म हेचि उदरी देही 

जन्मजन्मांतरीची ही नाती 

कर तव चरणी जुळती...


Rate this content
Log in