STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Inspirational

4  

अपर्णा ढोरे

Inspirational

विरपत्नीची मेंदी

विरपत्नीची मेंदी

1 min
40.6K


वाट तुझी मी बघते आहे,हस्ती रेखली मेंदी,

हृदयी तुझे नाव कोरले,जरी मिटली माझी मेंदी।।

मातृभूचे रक्षण करण्या सीमेवरती

उभास तू,

लाल बिंदी मज सांगत असते,माझा शूर लढवय्या तू।

त्या बिंदीच्या रंगासारखी दिसते माझी मेंदी......

तुझी सारखी आतुरतेने वाट बघते माझी मेंदी।।१

शत्रूंवरती ठेवसी तू बारीक करडी नजर,

बंदुकीच्या आवाजांचा घुमतो माझ्या कानी गजर,

संगीन धरल्या हस्तरेषा सम भासते माझी मेंदी....

रेषांमधल्या सुखद क्षणांना, शोधते माझी मेंदी।।२

खाण्या पिण्याचे भान नसे तुज कर्तव्यापुढे,

सय तुझी येता मज कडू लागे जिलबीचे तुकडे।।

चुलीतल्या त्या विस्तावासारखी धगधगते माझी मेंदी......

निखाऱ्याचे चटके सारे सोसते माझी मेंदी।।३

वीरपत्नी तुझीच मी रे मज जाण कर्तव्याची,

देश माझाही देव असे शपथ तुझ्या गळ्याची,

सुखापुढे माझ्या या फिकी पडते ही मेंदी......

जन्मोजन्मी तुझ्याच साठी रचेन मी रे मेंदी।।४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational