STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Inspirational

3  

अपर्णा ढोरे

Inspirational

सृष्टीची जादू

सृष्टीची जादू

1 min
29K


चिंब भिजलेले रान ओले5

बघता मी मोहरले,

हिरवाईची जादू पाहून

मनोमन मी बहरले!!१


नाजूक नवती पाने हिरवी

खुलती तरुच्या खांद्यांवर,

चिंब ओले अंग झटकती

रान पाखरे शाखेवर!!२


ओल्या थेंब सरींची नक्षी

मोहविते मजला भारी,

सृष्टीच्या कॅनव्हासवरती

रंग कुंचला कोण मारी?३


मध्येच मेखला इंद्रधनूची

आकाशात शोभतसे,

अदभुत नजारा बघुनि

नेत्र माझे दिपतसे!!४


साचलेली तळी जणू वाटे

गालावरची गोल खळी,

थेंब त्यातला पाण्याचा

भासे नवरंगाची रांगोळी !!५


मध्येच गुंजन कानी येई

स्वर हे धुंद वेडावती,

सृष्टीचे गान गाऊनि

परत मजला बोलावती!!६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational