STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Abstract Classics

3  

अपर्णा ढोरे

Abstract Classics

हिरवळ

हिरवळ

1 min
15.8K


कौलारू माझे घर,

सभोवती हिरवळ,

फुलांच्या ताटव्यांची,

मनमोहक दरवळ।।


हिरवळीचे सुंदर चित्र,

मोहविते माझ्या मना,

हा तलम गालिचा,

रोमांचिते मम तना।।


मोतीयासम दवबिंदू

तृण अंकुरी पहुडती,

वाटे उचलुनी घ्यावे,

अलगद बोटांवरती।।


फुलपाखरांच्या तऱ्हा,

दिसती मजला येथे,

चितारले रंगीत ठिबके

हिरव्या कागदावर जेथे।।


रानफुलांची गम्मत,

मजला भारी वाटे,

हिरवळ जणू आई

मांडीवर खेळवते।।


हिरवळीतली पायवाट,

जणू भांग केसातील

वाटसरूंना वाटे

देवदूत मार्गातील।।


उन्हाळ्यातही मजला

वाटे सुकूच नये ही

पिवळी न पडावी कधी

हिरवळ हिरवाई।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract