STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Classics Inspirational

3.2  

अपर्णा ढोरे

Classics Inspirational

पेरणी

पेरणी

1 min
17K


झाले शिवार तयार

डोळे जाई नभाकडे,

पाऊस बरसू दे रे बाप्पा

घाली देवाला साकडे।।१


पावसाची आली स्वारी

बळीराजाच्या शेतात,

करू लागला तयारी

पेरणीची तो जोमात।।२


झाले तिफनही सज्ज

बीज एकेक पेराया,

हाकतसे बळीराजा

मनी भाव विठुराया।।३


नांगरणी करताना

नाम देवाचेच ओठी,

कष्ट भारी उपसतो

अवघ्या या जगासाठी।।४


घेत नसे जरी माप

एका रांगेत पेरतो,

त्याच्या भूमितीचे साऱ्या

अप्रूप जगाला दावितो।।५


घरधनीण साजेशी

साथ देई मालकाला,

सर्जाराजाची ही जोडी

रातदिस संगतीला।।६


मनोभावे करीतसे

काळ्या आईची सेवा,

एका एका ढेकळात

त्यास दिसतसे मेवा।।७


पंढरीच्या पांडुरंगा

एवढे कर तू माऊली,

बळीराजावर धर

सदा कृपेची साऊली।।८




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics