STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Classics Romance

2.3  

अपर्णा ढोरे

Classics Romance

आरसाही लाजला

आरसाही लाजला

1 min
28.1K


सजताना आरशात पाहिले मी मजला,

रूप माझे पाहताच आरसाही लाजला।


पैठणी ही नवीकोरी,नेसले मी आज

चंद्रहार गळा घातला मोतीयाचा साज।।

नथ नाकामध्ये शोभे,केशी गजरा सजला।

रूप माझे पाहताच आरसाही लाजला।।


लोचनी काजळ आणि चमक माझिया डोळ्यांत,

गालावरची खळी खुलवे रूप माझे यौवनात,

गुलाबासम हास्य पाहून साजणही थिजला।।

रूप माझे पाहताच आरसाही लाजला।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics