अजून नाही
अजून नाही


अजून नाही
जगण्याची ही भाषा कुठली कळली अजून नाही।
हुजरेगीरी नसात भिनली, फळली अजून नाही।।
कोणकोणता मित्र असावा तपासून घे आधी।
जातीपाती पल्याड नाती वळली अजून नाही।।
नाही सुटली गणिते काही, नाही जुळला ताळा।
आयुष्याची प्रश्नमंजुषा, टळली अजून नाही
अत्याचार ती सांगत नाही ,शोधत बसते रामा।
गल्लोगल्ली सीता अहिल्या ढळली अजून नाही।
वाटेवरचा तो चोर नको वा घोड्यावरचा राजा।
हवा सोबती ज्याची माया मळली अजून नाही।।