अजून नाही
अजून नाही
1 min
26.4K
जगण्याची ही भाषा कुठली कळली अजून नाही।
हुजरेगीरी नसात भिनली ,फळली अजून नाही।।
कोणकोणता मित्र असावा तपासून घे आधी।
जातीपाती पल्याड नाती वळली अजून नाही।।
नाही सुटली गणिते काही, नाही जुळला ताळा।
आयुष्याची प्रश्नमंजुषा, टळली अजून नाही
अत्याचार ती सांगत नाही ,सोधत बसते रामा।
गल्लोगल्ली सिता अहिल्या ढळली अजून नाही।
वाटेवरचा तो चोर नको वा घोड्यावरचा राजा।
हवा सोबती ज्याची माया मळली अजून नाही।।
