कितीदा
कितीदा
माळून रातराणी गंधाळते कितीदा।
दाबून यातनांना मी जाळते कितीदा।।
तू लाख बोल खोटे कोर्टात काळजाच्या।
दे लाच चांदण्यांची ,सांभाळते कितीदा।।
पाहून अप्सरा ती बेभान तू नशेने।।
ओठांवरी तिच्या मी रस गाळते कितीदा।।
मी हद्दपार केले माझ्याच आसवांना।
पाहून रक्त पाठी ओशाळते कितीदा।।
फिरतो कुठेकुठे तू , मी एकटी बहरते।
रागावला बहर की मग टाळते कितीदा।।
दिनक्रम रोजचा तो, नाही थरार कसला।
मी वाचता मला ही कंटाळते कितीदा।।
ती नोकरी तुझी रे वरचढ सवत होते।
देवून चार दिमक्या मज पाळते कितीदा।।
