ती ही मजेत अडके...
ती ही मजेत अडके...
1 min
27.7K
ती ही मजेत अडके या चाकरीत माझ्या।
म्हणते खुशाल फसतो तो साखळीत माझ्या।।
भटके उन्हात जेव्हा आणावयास पाणी।
घेते क्षणी विसावा ,ती सावलीत माझ्या
चाफा ,गुलाब ,मोगर फुलतो मिठीत जेव्हा।
मातीस गंध लाभे या झोपडीत माझ्या।।
शोधून आज दमले , जागा परोपकारी।
मी ही मलाच खेटे या पोकळीत माझ्या।।
जन्मास लेक आली ,उत्सव मनात भरला।
भासे अबोल आई या छोकरीत माझ्या।
ती रात्र पावसाळी ,होता मिठीत चाफा।।
सजला अबोल मोहर ह्या ओंजळीत माझ्या।।
ना चंद्र सोबतीला ,ना साथ काजव्यांची।
जळतो मुकाट अश्रू या देवळीत माझ्या।।
