प्रपोज
प्रपोज
निदान आता सपोज कर ती म्हणून गेली।
हवे तसे तू प्रपोज कर ती म्हणून गेली।।
किती कितीदा निवड बदलते तुझी सतत रे ।
झकास वेळीच चोज कर ती म्हणून गेली।
किती जणींना गुलाब देतो कळेच ना तर
मलाच तसे रोज, रोज कर ती म्हणून गेली।
तुझ्याप्रमाणे अनेक असतात भाळणारे।
असेल हिम्मत ,अपोज कर ती म्हणून गेली।
मनात लपवू नको समोरा समोर ये तू।
लबाड डोळेच क्लोज कर ती म्हणून गेली
