ढेरीचे पुराण
ढेरीचे पुराण


माझे पोट आत घेऊ घेऊ
कोंडत आहे माझा श्वास
कधी कमी होईल या ढेरीचा
इतका पुढे येण्याचा हा त्रास।।
पैंट ला बेल्ट लावताना
बेल्टच बंकल नाही दिसत
बेल्ट किती ही पक्का लावा
फिट पैंट ला नाहीच बसत।।
पायात सॉक्स घालतांना ही
ही ढेरी नेमकी येते आडवी
चारचौघात बसता उठताना
ही महाकाय ढेरी चिंता वाढवी।।
किती वेळ बदलावे कपडे
काही केल्या नाही कळत
लहान झालेल्या कपडयांची
घरात पडून आहे मोठी चळत।।
<
br>
रेडीमेड कपडयांचा तर मला
नेहमीच आवरावी लागते आवड
माझ्या मापाच्या शर्ट पैंट ची
करू शकत नाही मी तेथे निवड।।
खुर्चीत बसतांना ही माझ्या
फजीतीला पारावर नसतो
खुर्चीतून उठताना मात्र मला
आताकसे उठू हा प्रश्न असतो।।
फोटो काढताना तर नेहमी
पोट आत ओढून घ्यावे लागते
लवकर काढला नाही फोटो
तर लगेच मला धाप लागते।।
कशी काय घेऊ ही ढेरी
आत हाच आहे यक्षप्रश्न
कोण सांगेल यावर उपाय
हाच सतत असतो प्रश्न।।