STORYMIRROR

Sanjay Pande

Tragedy

3  

Sanjay Pande

Tragedy

पाणी

पाणी

1 min
191


बाबा, सांगा ना हो मला

पाणी का बरे सर्व संपवले

तुमच्या पिढीने का नाही

पाणी जपून जपून वापरले।।


मी ऐकले तुम्ही तर रोज

शॉवरखाली करायचा आंघोळ

अर्धा अर्धा तास आंघोळीनेच

तर बाबा झाला आहे घोळ।।


आता तर आंम्हाला थोड़े फार

हातपाय धुवायला पण नाही पाणी

बाबा तुमच्या अश्या अघोरी

पाणी वापराने किती झाली हानी।।


बाबा तुम्ही तर आपले आँगन 

रोज पाण्याने घासू घासू धुवायचे

आपली कार पण तुम्ही नळाला

पाईप लावून धुवू धुवू पुसायचे।।


दाढी करताना ही बेसिन चा नळ

तुम्ही चालू करून ठेवायचे म्हणे

आई ही भांडी घासतांना नळाची

तोटी चालू ठेऊन घासायची म्हणे।।


असे कसे हो बाबा तुम्ही अविचारी

पाण्याचा अपव्यय करत वागले

आपल्या मुला-नातवंडाना असे

पाण्यासाठी तड़फड़ावे लागले।।


किती सांगितले सरकार ने तरी

तुम्ही केली नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग

राब राब राबुन पैसा ठेवला कमावून

पण पाण्याची केली नाही इन्वेस्टिंग।।


बाबा आता सांगा ना मला जरा

पैसा पिता येईल का हो मला

पैसा तर मी ही असता कमावला

पण पाणी कसे कमावता येईल मला।।


घरोघरी कपडे धुवायला तुम्ही

केला वॉशिंग मशीनचा वापर

का आम्ही फोड़णार नाही सांगा

तुमच्यावर पाणी नासाडीचे खापर।।


बाबा आम्हाला ही हे मान्य आहे 

तुम्ही आमच्यासाठी खाल्ल्या खस्ता

तुमच्या मेहनतीमुळेच जीवनात

आंम्हाला दिसतोय हा सुंदर रस्ता।।


बाबा, तुम्ही भले जीवनात काही 

केली नसेल हो आतापर्यंत वाईट

पण पुढे पाणी मिळेल की नाही

याचा कधी विचार केला का राईट।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy