जात !!!
जात !!!
आज सर्व हिम्मत एकटवून
मी तीला सांगूनच टाकलं
माझं हृदय तुझ्या प्रेमात
आहे गं अडकलेलं
ऐकून ती शॉक झाली
दोन मिनीटे स्तब्ध झाली
नंतर छानशी हसली
आणि मग उत्तरली
तूही मला आवडतोस राजा
मलाही हवी होती तुझी साथ
पण मी काय करू आता
वेगळी आहे आपल्या दोघांची जात

