हाच का माझा गुन्हा...
हाच का माझा गुन्हा...
मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, पण तुला कधी सांगू नाही शकलो, मी मैत्रीत आपलं प्रेम जपलं...
पण तुला ते कळलं आणि तू काहीही न समजून घेता आपल्या मैत्रीचं नात देखील तोडल...
कदाचित याच कारणामुळे माझ्यातील भावना या कवितेतून व्यक्त होत असतील...
कदाचित याच कारणामुळे माझ्या लेखणीला रोजचे नवीन विषय मिळत असतील...
पण तुझ्या अश्या अचानक दूर जाण्याने माझ्यातील कवी देखील मेला...
अग तुझ्या या हृदयभेदक विरहाने माझ्यातील कलाकाराचा खून गं केला...
कितीही विसरावे म्हटले तुला तरी या वेड्या मनाला आठवण तुझी येते पुन्हा पुन्हा...
अन् मनात एक शंका राहून जाते की मी तुझ्यावर केलेलं निस्वार्थ प्रेम हाच का माझा गुन्हा...

