माफ कर...
माफ कर...
फक्त चार दिवस झाले तुला न बघून
तरी हृदयात मात्र विरहाचा वणवा पेटला
नेहमी सकारात्मकतेच व्यक्तिमत्त्व माझं
तरी मनात मात्र कुठेतरी अंधार दाटला
दिवसभर तन-मन थकतय माझं
तरी झोप मात्र न ये रात्रीला
उशी आसवांनी होतेय ओली
मनं स्वीकारत नाहीये विरहाला
सखे सतावतो तुझा हा दुरावा रोज
असह्य वेदना ह्या माझ्या मनाला
तू पुन्हा येशील ही आस असली तरी
कसे समजावू या मनातील काळोखाला
प्रत्येक क्षण करून देतोय तुझी आठवण
तुझा माझ्याशी एवढा रुसवा कशाला
कदाचित चुकलं असेल माझही राणी
आता तरी माफ कर तुझ्या राजाला

